मुंबई : प्राथमिक फेरीपासूनच उत्तरोत्तर चुरशीच्या ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत मुलुंड येथील विनायक गणेश वझे महाविद्यालयाच्या ‘एकूण पट-१’ या एकांकिकेने ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ होण्याचा बहुमान पटकावला. द्वितीय पारितोषिकावर ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘उणिवांची गोष्ट’ आणि तृतीय पारितोषिकावर नाशिकच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या ‘लाल डबा’ या एकांकिकेने नाव कोरले.

वैविध्यपूर्ण आशय आणि प्रभावी सादरीकरण असलेल्या दर्जेदार एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत प्रेक्षकांना पाहता आल्या. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात आणि रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी माटुंग्यातील यशवंत नाटय़ मंदिरात रंगली.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta lokankika competition
लोकसत्ता लोकांकिका : विभागीय अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड, आपल्या भागातील विषय मांडणीला प्राधान्य
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

हेही वाचा >>> शिखर बँक प्रकरण तपासाची सद्य:स्थिती काय? विशेष न्यायालयाची आर्थिक गुन्हे विभागाकडे विचारणा

यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर या आठही केंद्रांवर स्पर्धा झाली. कल्पकतेला प्रयोगशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या एकांकिका पाहण्यासाठी रसिकप्रेक्षकांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच यशवंत नाटय़ मंदिराबाहेर गर्दी केली होती. तसेच सर्व नाटय़संघ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नाटय़गृहापर्यंत आले होते. महाअंतित फेरीतील एकांकिका सादरीकरणास सुरुवात होण्यापूर्वी रंगमंचामागे रंगभूषा आणि वेशभूषेची अंतिम टप्प्यातील तयारी सुरू होती. प्रकाशयोजना आणि संगीत संयोजनाचीही चाचपणी चालू होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर महाअंतिम फेरीचे काहीसे दडपण होते, मात्र तितक्याच आत्मविश्वासाने त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले. अखेर तिसरी घंटा वाजली आणि रंगमंचाचा मखमली पडदा उघडला. टाळय़ांचा कडकडाट, जल्लोष, आपापल्या संघाला प्रोत्साहन देण्याची चुरस यांसह महाअंतिम फेरी सुरू झाली. नाटय़-चित्रपट सृष्टीतील दिग्गज, रसिकप्रेक्षक, नाटय़प्रेमी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी नाटय़गृह खचाखच भरले होते.

लेखक-दिग्दर्शक-अभिनेते संजय मोने, अभिनेते अतुल परचुरे आणि लेखिका-अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी हे महाअंतिम फेरीचे परीक्षक होते. निवेदक कुणाल रेगे यांनी अनोख्या शैलीत सूत्रसंचालन करून स्पर्धकांसह रसिक प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. वैविध्यपूर्ण आशयाला कसदार अभिनय आणि वैशिष्टय़पूर्ण तांत्रिक गोष्टींची जोड देत रंगत गेलेल्या स्पर्धेच्या निकालाचा क्षण जवळ आला आणि स्पर्धकांसह प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली. विजेत्यांची नावे जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर जल्लोषाने नाटय़गृह दणाणून गेले. प्रसिद्ध अभिनेते सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी सौरभ शुक्ला यांनी रसिकप्रेक्षकांशी संवाद साधत युवा रंगकर्मीना मार्गदर्शनही केले.

विषय वैविध्याचे रंग

राजकीय – सामाजिक घडामोडींशी निगडित आणि मानवी भावभावनांचा वेध घेणाऱ्या विषयांवरही विद्यार्थी रंगकर्मीनी एकांकिकांच्या माध्यमातून भाष्य केले. एकांकिकेचा आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बोलीभाषेचाही वापर करण्यात आला. कल्पक विचारांची भरारी घेत काल्पनिक कथा आणि गावखेडय़ातील प्रश्नांपासून ते आजच्या आधुनिक जगात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतची तरुणाईची विचारस्पंदने एकांकिकांमध्ये उमटली.

मान्यवरांकडून कौतुकाची थाप

‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी, ‘भारती विद्यापीठ’चे मििलद जोशी, ‘केसरी टूर्स’च्या सुनिता पाटील, ‘एन. एल. दालमिया इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च’चे डॉ. मकसूद खान, ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’चे चिंतन जैन, ‘अस्तित्व’चे रवी मिश्रा आणि ‘आयरिस प्रॉडक्शन्स’चे विद्याधर पाठारे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, नाटय़निर्माते दिलीप जाधव, निर्मात्या वैजयंती आपटे, नाटककार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, रंगकर्मी अजित भुरे, निळकंठ कदम, मकरंद अनासपुरे, विजय निकम, अरविंद औंधे, संदेश बेंद्रे, अद्वैत दादरकर, प्रणव रावराणे, अनिल बांदिवडेकर, कुमार सोहोनी, विश्वास सोहोनी, संजय क्षेमकल्याणी, सुनील देवळेकर, वर्षां दांदळे, रणजित पाटील, निमिश कुलकर्णी, अंबर हडप, रोहन गुजर, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळय़े यांसह अनेक कलाकार, नाटय़कर्मी आवर्जून उपस्थित होते.

महाअंतिम निकाल

* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम :  एकूण पट – १ (विनायक गणेश वझे स्वायत्त महाविद्यालय, मुंबई)

* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : उणिवांची गोष्ट (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे)

* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय :  लाल डबा  (के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक)

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (कै. विनय आपटे स्मृती पारितोषिक) : अमित पाटील, सिद्धेश साळवी (एकूण पट – १)

* सर्वोत्कृष्ट लेखक : सिद्धेश साळवी (एकूण पट – १)

* सर्वोत्कृष्ट अभिनय : श्रेयस जोशी- सिनेमा (मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे)

* सर्वोत्कृष्ट अभिनय : सानिका देवळेकर (उणिवांची गोष्ट)

* सर्वोत्कृष्ट अभिनय : राहुल पेडणेकर (एकूण पट – १)

* सर्वोत्कृष्ट नेपथ्य : अद्वैत, अमित, प्रथमेश (एकूण पट – १)

* सर्वोत्कृष्ट संगीत : रवींद्र कोलते, नूर – ए – अखलाख (सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती

संभाजीनगर)

* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : सौरभ शेंडे, चला निघायची वेळ झाली (भारतीय कला वाणिज्य महाविद्यालय, अमरावती)

अभिनय प्रशस्तीपत्रक

* मनस्वी लगाडे (एकूण पट – १) 

* विक्रांत संसारे (लाल डबा) 

* श्रेया दुधगावकर (पार करो मोरी नैया) विवेकानंद महा., कोल्हापूर * साक्षी बने (कोंडी) गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय, रत्नागिरी

Story img Loader