मुंबई: वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात देवनार पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी काही रिक्षा चालकांविरोधात गुन्हाही दाखल केला असून पोलिसांनी आठ रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गोवंडी – शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले होते. रिक्षामधून तीन प्रवाशांना घेऊन जाण्यास परवानगी आहे. असे असताना चालक पाच ते सहा प्रवाशांना रिक्षातून घेऊन जात होते. यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेमुळे काही नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन देवनार पोलीस, वडाळा परिवहन विभाग आणि मानखुर्द वाहतूक विभाग यांनी संयुक्तरित्या गुरुवारी गोवंडी परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली होती.

Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
excise department registered 226 cases of illegal liquor traffic in suburbs
अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल

हेही वाचा – संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल

हेही वाचा – मुंबई : अंगावर पाणी उडाल्याने अन्नपदार्थ घरी पोहोचविणाऱ्याने केला चाकू हल्ला

u

नियम धाब्यावर बसवून रिक्षातून प्रवाशांची अवैध वाहतूक करणे, वाहतुकीचे नियम मोडून भरधाव वेगात वाहन चालविणे, रस्त्यावर अनधिकृरित्या वाहने उभी करणे आदी प्रकरणी एकूण ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. यापैकी आठ रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चालकांच्या रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. तसेच अन्य १२ रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिसरात सुरू असलेल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.