मालाड दुर्घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाइकांच्या भावना

मुंबई : मालाडच्या दुर्घटनेतील बहुतांश रुग्णांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातील पहिला आणि तिसरा मजला जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांनी गजबजला होता. आपल्या माणसांना शोधायला हे नातेवाईक ठाणे, पुणे, कोलाड अशा विविध भागांतून आले होते. रुग्णालयातील जखमी माणसाजवळ थांबायचे की न सापडलेल्या माणसाला शोधायला जायचे अशा द्विधा मन:स्थितीत हे नातेवाईक दिवसभर रुग्णालयात बसून होते.

Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….
Former MP Kisanrao Bankheles son commits suicide
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका
Two brothers beaten up by developer in Palava Dombivli for demanding salary
वेतनाची मागणी केली म्हणून डोंबिवलीत पलावा येथे दोन भावांना विकासकाची मारहाण

आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या दिराचा फोन आला तेव्हा मी कुटुंबासह गावी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले होते. मात्र पावसामुळे ट्रेन ठाण्यातच अडकलेली. दिराने झालेली घटना सांगितली, पण ट्रेनमध्येच अडकल्याने सकाळी रुग्णालयात आल्याचे डोंबिवलीच्या प्रीती सुर्वे यांनी सांगितले. या दुर्घटनेमध्ये त्यांच्या पुतणीचा मृत्यू झाला आहे. दीर कामावर असल्याने ते वाचले.    त्यांची पत्नी आणि दोन मुली जखमी झाल्या असून शताब्दीमध्ये उपचार घेत असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

आंबेडकरनगरचे गणेश भातडे रात्री मोठा आवाज आल्याने काय झाले पाहायला बाहेर आले. हा त्यांच्या आठवणीतला शेवटचा क्षण. पुढे काय घडले ते कळलेच नाही.. असे त्यांचे नातेवाईक दीप्ती सालप सांगत होत्या. ‘आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा एका सहा महिन्यांच्या बाळाला बाहेर काढले होते,  असा अनुभव दीप्ती सालप यांनी सांगितला.

कोलाडच्या विनिता निकम यांना मुंबईतील दुर्घटनेचा निरोप मिळला आणि सकाळी ७ वाजता त्यांनी गाव सोडले. त्या थेट मालाडला पोहोचल्या. त्यांच्या सुनेची बहीण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली. घटना घडली तेव्हा घरात दोन महिला व चार पुरुष होते. चार पुरुष गंभीर जखमी असून दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

विक्रोळीच्या सविता जाधव आपल्या जखमी नणंदेला धीर द्यायला आल्या आहेत. ‘नणंदेचा नवरा कामावर होता म्हणून वाचला, १५ वर्षांची मुलगी मात्र मृत्युमुखी पडली’, असे सविता सांगत होत्या. शताब्दी रुग्णालयात दाखल असलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाची आई या दुर्घटनेत मृत पावली आहे. पण त्याला हे सांगायचे कसे या विवंचनेत त्यांचे शेजारी  रुग्णालयात बसून आहेत.

रुग्णालयात जखमी आणि मृतांच्या नातेवाइकांचा गोंधळ एकीकडे सुरू होता, तर दुसरीकडे सकाळी अचानक ही दुर्घटना घडल्यानंतर एकापाठोपाठ एक रुग्ण आल्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. ७० हून अधिक जखमींना एकावेळी उपचार देण्यासाठी तारेवरची कसरत सुरू होती.

Story img Loader