मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी इतर मागासवर्गासाठीच्या ६३ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. जाहीर होणाऱ्या आरक्षणाबाबत २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात इतर मागासवर्गिय आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यामुळे आता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या २३६ जागांपैकी इतर मागासवर्गासाठी (ओबीसी) ६३ जागा आरक्षित होणार आहेत. ६३ पैकी ३२ जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. तर १५५ जागा खुल्या गटासाठी राहणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने ३१ मे रोजी लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जाती व जमातींसाठी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत कायम राहणार आहे. मात्र ३१ मे रोजी महिलांसाठी निश्चित केलेले प्रभाग आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

इतर मागासवर्गीयांसाठी मुंबईत २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसारइतर मागसवर्गासाठी ६३ प्रभाग आरक्षित असतील. इतर मागासवर्गीयांसाठी २००७, २०१२ व २०१७ मध्ये आरक्षित असलेले प्रभाग वगळून उर्वरित प्रभागांतून आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. या पद्धतीनेच इतर मागासवर्ग महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

प्रभागांसाठी सोडत काढण्यात आल्यानंतर ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्या येणार आहे. तर आरक्षण सोडतीवर ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील. ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत आपल्या हरकती व सूचना सादर करता येतील.

आकडेवारी

मुंबईची एकूण लोकसंख्या ……१ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३

अनुसूचित जातींची लोकसंख्या …..८ लाख ३ हजार २३६

अनुसूचित जमातींची लोकसंख्या ….१ लाख २९ हजार ६५३

प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या सरासरी ५२ हजार ७२२

एकूण प्रभाग ….२३६

महिलांसाठी राखीव …..११८

अनुसूचित जातींसाठी राखीव ….१५……महिलांसाठी ……८

अनुसूचित जमातींसाठी राखीव …..२ ……..महिलांसाठी ……१

इतर मागासवर्गासाठी …६३

इमतर मागारवर्ग महिलांसाठी ….३२

सर्वसाधारण वर्गासाठी …….१५६ जागा

सर्वसाधारण महिलासाठी …. ७७ जागा