मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असून तलावांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा मुबलक असला तरी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी त्यात एक टक्क्याने घट झाली असून, सातही तलावांमधील आज (शुक्रवार) ८७.६५ टक्के पाणीसाठा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात सध्या एकूण १२ लाख ६८ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेला पाणीसाठ्यात अवघ्या पंधरा दिवसात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता पाणीपातळी कमी होऊ लागली नाही. धरणाच्या पाणीसाठयात सध्या १२ टक्के तूट आहे. पाऊस लांबला तर ही तूट वाढण्याची शक्यता आहे. मोडक सागर आणि तानसा व तुळशी हे तलाव पूर्ण भरले आहेत. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तीन वर्षांचा २२ जुलैपर्यंतचा जलसाठा –

वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी

२०२२ – १२,६८६५६ …… ८७.६५ टक्के

२०२१ – ७,७९,५६८ …. ५३.८६ टक्के

२०२० – ४,१६,४२९….. २८.७७ टक्के

Story img Loader