मुंबई : हार्बर मार्गावरील रे रोड येथील उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी फुटली असून पुलाजवळ पाणीच पाणी साचले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागाला संध्याकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
शिवडी पूर्व परिसराला फोर्सबेरी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयाला सलग्न असलेली मुख्य जलवाहिनी रे रोड पुलाजवळ सोमवारी दुपारी फुटली. यामुळे जलशयातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाली. पुलाच्या बाजूला पाणी साचले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाहनांना वाट काढावी लागत होती.
हेही वाचा – प्रवाशांची आर्थिक कोंडी, खासगी वाहतूकदारांकडून बसभाड्यात वाढ
मुंबई : हार्बर मार्गावरील रे रोड येथील उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी फुटली असून पुलाजवळ पाणीच पाणी साचले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागाला संध्याकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. pic.twitter.com/XnlxYurBOe
— LoksattaLive (@LoksattaLive) December 30, 2024
जलवाहिनी फुटल्यामुळे इंदिरा नगर, हाजी बंदर रोड, फोर्स बेरी रोड, कोळसा बंदर, रेती बंदर, जय भीम नगर, अमन शांती नगर, पारधी वाडा परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. या परिसरातील रहिवाशांना संध्याकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दुपारी हाती घेतले असून रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिवडी परिसरातील नागरिकांना उद्याच पाणीपुरवठा होऊ शकणार आहे, अशी माहिती संबंधित जलखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.