मुंबई : महानगरपालिकेने शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या व जीर्ण जलवाहिनींच्या बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत ‘जी दक्षिण’ विभागातील रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परिणामी, जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा ६ जून रोजी रात्री ९.४५ वाजल्यापासून ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

हेही वाचा – मुंबई : स्वच्छता मोहिमेत १५७ मेट्रिक टन राडारोडा व ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन

या दुरुस्तीकामासाठी १७ तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या दुरुस्ती कामादरम्यान जी दक्षिण विभागातील करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोज, बीडीडी चाळ, लोअर परळ या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.