मुंबई : मुंबईतील हवेचा दर्जा शुक्रवारीही ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मुंबईतील काही भागात शुक्रवारी ह्यवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली होती. ‘समीर’ अॅपनुसार शुक्रवारी सायंकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११४ इतका होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जाणून घ्या, थंडी का आणि किती दिवस?

मुंबईत सध्या आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. समीर अॅपच्या नोंदीनुसार शुक्रवारी सायंकाळी नेव्हीनगर कुलाबा येथील हवा निर्देशांक २१५, तर खेरवाडी वांद्रे येथील २०६ होता. तसेच, देवनार येथील हवा निर्देशांक २२२ इतका होता. म्हणजेच या भागातील हवा शुक्रवारी ह्यवाईटह्ण श्रेणीत नोंदली गेली. दरम्यान, गुरुवारीदेखील सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तवला आहे.