मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरांत पहाटे किंचीतसा गारवा असला तरी तापमान हळूहळू वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांत सोमवारी कमाल तापमान सरासरी दोन अंशाहून अधिक होते. याचबरोबर कुलाबा येथील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Maharashtra Weather Update : नगरमध्ये पारा १२.६ अंशांवर; जाणून घ्या, राज्यभरात थंडी का वाढली

राज्यात सर्वाधिक किमान तापमान सोमवारी कुलाबा येथे नोंदले गेले. मुंबईत पहाटे काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती आहे. यातच कधी कमाल, किमान तापमानात कधी घट, तर कधी वाढ होत आहे. किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे पहाटे किंचीतसा गारवा राहील. मुंबईत किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानाचा पारा देखील अजून चढा आहे त्यामुळे दिवसा वातावरणात उष्मा जाणवत आहे. थंडी पडण्यासाठी किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात देखील घसरण होणे गरजेचे आहे.

दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांनी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमान १८ – २० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.