मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग
कुठे : ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर

Mumbai, Mumbai's Barfiwala Bridge, Barfiwala Bridge Elevated to Connect with Gokhale Bridge, Barfiwala Bridge Elevated, Gokhale Bridge, Avoiding Costly Reconstruction, Andheri
तीन हजार मेट्रिक टन वजनाचा पूल उचलला, बर्फीवाला पूल जोडणीची अवघड कामगिरी
Wrong Signal Wadala Station
मुंबई : स्टेशन मास्तरचा चुकीचा सिग्नल अन् गोरेगावला जाणारी लोकल वाशीला निघाली, पुढे काय झालं?
Central Railway, CSMT Local,
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल; सीएसएमटी लोकलची धाव परळ, कुर्ल्यापर्यंत
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
mumbai local train services, central railway, Technical Fault, vikhroli station
मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकलमधून उतरून रेल्वे रूळावरून चालत जाण्याची प्रवाशांवर वेळ

कधी : सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत

परिणाम : सकाळी ९.४६ ची सीएसएमटी ते बदलापूर, सकाळी १०.२८ ची सीएसएमटी ते आसनगाव, सकाळी १०.२८, दुपारी ३.१७ ची कल्याण ते सीएसएमटी या जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी ९.५० वाजताची वसई रोड- दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.४५ वाजताची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल.दुपारी १२.५० वाजता वसई रोड-दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी २.४५ वाजता दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथए स्थगित करण्यात येईल.

हेही वाचा…सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणा, मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.

हेही वाचा…मुंबई : भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत ७ ते ८ लाख क्रिकेटप्रेमी

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड ते विरार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.