मुंबई : पश्चिम रेल्वेने दसऱ्याचा मुहूर्त साधून शनिवारपासून लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या १० लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याने एकूण २०९ फेऱ्या चालवण्यात येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसऱ्याच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वेवर १२ नव्या उपनगरी रेल्वेगाड्या सुरू जातील. पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांची संख्या १,३९४ वरून १,४०६ इतकी होईल. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले. डहाणू आणि विरार विभागातील प्रवाशांना विस्तारित केलेल्या उपनगरी रेल्वेगाड्यांचा फायदा होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हे ही वाचा… रुग्णशय्येवरील उपचारांबाबत इच्छापत्रानुसार निर्णय

फेऱ्यांचा विस्तार

नव्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या सहा फेऱ्यांचा विस्तार केला आहे. यात तीन अप आणि तीन डाऊन दिशेकडील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांचा समावेश आहे. अप दिशेने बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता सुटते. तर, ही लोकल भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटून चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहोचेल. विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल. वसई रोड – चर्चगेट जलद लोकल आता विरारवरून सुटेल.

वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोहोचेल. चर्चगेटहून सकाळी ९.१९ वाजता सुटणारी चर्चगेट – बोरिवली जलद लोकल लोकल विरारपर्यंत विस्तारित केली आहे. ही लोकल सकाळी १०.३९ वाजता विरारला पोहोचेल. दुपारी ४.३७ वाजता अंधेरी-विरार जलद लोकल दादरवरून दुपारी ४.४८ वाजता सुटेल. तर, विरारला सायंकाळी ५.४४ वाजता पोहचेल. चर्चगेटहून सायंकाळी ७ वाजता सुटणारी चर्चगेट-वसई रोड जलद वातानुकूलित लोकल विरारपर्यंत विस्तारित केली असून ही लोकल विरारला रात्री ८.२२ वाजता पोहोचेल.

हे ही वाचा… विकासकामांच्या माध्यमातून मुंबईत आमूलाग्र परिवर्तन

बदल काय ?

पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात अप दिशेने सहा नव्या लोकल सेवांचा समावेश असेल. त्यात विरार – चर्चगेट जलद एक लोकल फेरी, डहाणू रोड – विरार दरम्यान दोन धीम्या लोकल फेऱ्या आणि अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली – चर्चगेट दरम्यान प्रत्येकी एका धीम्या लोकल फेरीचा समावेश आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या चर्चगेट – नालासोपारा दरम्यान एक जलद लोकल फेरी असेल. तसेच चर्चगेट – गोरेगावला जोडणाऱ्या दोन धीम्या फेऱ्या आणि चर्चगेट – अंधेरी दरम्यान एक धीमी फेरी आणि विरार – डहाणू रोड दरम्यान दोन लोकल फेऱ्या असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai western railway new local train timetable 209 trips of 15 coach local train mumbai print news asj