मुंबई : ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटण जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात पालिकेने वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
मत्स्य दंश झाल्यास काय करावे
१)‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
२)‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
३)जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
हेही वाचा : “शेरास सव्वाशेर गुजराथी, मारवाडी, जैन मराठी लोकांना लाथ घातलो तेव्हा…”, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
४)जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
५)मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
६)जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.