मुंबई : सुरत येथे भव्य हिरेबाजार केंद्र (डायमंड बोर्स) सुरु झाल्याने मुंबईला मोठा आर्थिक धक्का बसला असून महाराष्ट्राचे महसुलाचे मोठे नुकसान होणार आहे. मुंबईतील हजारो कार्यालये बंद होत असल्याने नागरिकांना रोजगारालाही मुकावे लागेल.

मुंबईत सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय असलेली किरण जेम्स ही कंपनी नुकतीच गुजरातला स्थलांतरित झाली. एकामागोमाग एक अनेक हिरे व्यवसायातील कंपन्या मुंबईतील व्यवसाय गुजरातला नेत आहेत. हिरे व्यवसायातील अनेक व्यापारी सुरत व गुजरातेतील असून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अनेक वर्षांचा जुना व्यवसाय असल्याने मुंबईत होते. वांद्रे-कुर्ला संकुलात हिरे बाजाराची मोठी इमारतही उभारण्यात आली होती. पण हिरे बाजार सुरतला हलविण्यात आल्याने मुंबईचे मोठे नुकसान होणार आहे.

trade war Nifty news in marathi
मोठ्या आपटीतून सावरला, तरी ‘सेन्सेक्स’चे ३१९ अंशांचे नुकसान ; व्यापार युद्धाच्या धास्तीने जागतिक बाजारात मात्र मोठी पडझड
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
Sant dyanshwaranchi muktai
संत मुक्ताईंच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Chief Minister Devendra Fadnavis paid tribute to Narendra Chapalgaonkar Mumbai news
चिंतनशील साहित्यिकाच्या निधनाने वैचारिक क्षेत्राचे नुकसान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी

हेही वाचा >>>मुंबईतील हिरे व्यापाराला मोठा आर्थिक फटका? वित्तीय केंद्रापाठोपाठ हिरे बाजारही गुजरातमध्ये

नवी मुंबईत भव्य हिरेबाजार केंद्र उभारणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. सुरतला कार्यालय असताना मुंबईतील कार्यालय सुरु ठेवण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे अनेक हिरे व्यापारी व कंपन्या गुजरातला स्थलांतरित होत आहेत असे हिरे व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

वित्तीय केंद्रापाठोपाठ हिरे बाजारही गुजरातमध्ये

मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारण्याची योजना होती. ‘यूपीए’ सरकारच्या काळात अर्थसंकल्पात त्याची घोषणाही झाली होती. पण केंद्रात सत्ताबदल होताच भाजप सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ मध्ये सुरू केले. ‘सुरतमध्ये हिरे बाजार हलविण्यात आल्याने मुंबईतील लाखो कामगार रोजगाराला मुकतील, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

Story img Loader