मुंबईः मरीनड्राईव्ह येथील पंचतारांकित हाॅटेलमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. विनती मेहतानी असे या महिलेचे नाव आहे. हाॅटेलच्या २७ व्या माळ्यावरील खोलीत ही महिला होती. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांंनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हाॅटेलच्या कर्मचाऱ्याने रूमची बेल वाजवली. त्यावेळी महिलेने दार उघडले नाही. मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता. महिलेचा मृतदेह सापडला. रविवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला पेडर रोडवरील चेलाराम हाऊस परिसरात रहाते. मृत महिला हाॅटेलमध्ये ६ जानेवारीला आली होती. तेव्हापासून ती खोलीत एकटीच राहत होती. त्याचबरोबर इतर माहिती पोलिस घेत आहेत.

हेही वाचा – सैफ हल्ला प्रकरणः सैफची सदनिका, इमारतीतून आरोपीचे १९ फिंगरप्रींट सापडले

हेही वाचा – मुंबई मॅरेथॉनमध्ये २७ जण रुग्णालयात दाखल, एका रुग्णावर अँजिओप्लास्टी

मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली असून संशयास्पद काही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी व्हिसेराचे नमुने पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान मृत महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai woman deadbody was found in a five star hotel at marine drive mumbai print news ssb