मुंबई : मालाडमधील एका घरात शिरलेल्या बुरखाधारी महिलेने ९१ वर्षीय महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिला लुटण्याचा प्रयत्न केला. वृद्ध महिलेने धैर्य दाखवून आरडाओरडा केल्यानंतर आरोपी महिलेने तेथून पळ काढला. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार आयेशा शेख (९१) मालवणी येथील एमएचबी कॉलनी परिसरात राहतात. रविवारी त्या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या घरात एक बुरखाधारी महिला शिरली. तिने तक्रारदार महिलेच्या डोळ्यात व तोंडात मिरचीपुड टाकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या गोंधळल्या.

हेही वाचा…औषध आणीबाणी टळली, औषध वितरकांची दोन आठवड्यात देयके मंजूर होणार

आरोपी महिलने शेख यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेख यांनी हातातील ग्लासने आरोपी महिलेला मारले. तसेच शेख यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी महिलेने तेथून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे शेजारी तेथे धावत आले. परंतु तोपर्यंत आरोपी महिलेने तेथून पळ काढला. याप्रकरणी शेख यांच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.

Story img Loader