मुंबईच्या वरळी भागात BMW कारनं एका जोडप्याला उडवल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाचा सहभाग असल्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. या अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ५० वर्षीय प्रदीप नाखवाहे जखमी झाले आहेत. या प्रकरणी रविवारी सकाळपासून अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता आपल्या मुलाला या अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी शिंदे गटाचे उरपनेते राजेश शाह यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या वरळी भागात रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रविवारी सकाळी वरळीच्या क्रॉफर्ड मार्केट भागात राजेश शाह यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर शाह त्यांची बीएमडब्ल्यू ही आलिशान कार चालवत होता. प्रदीप नाखवा पत्नी कावेरी नाखवा यांच्यासह क्रॉफर्ड मार्केटहून परत येत असताना त्यांच्या बाईकला मिहीरनं मागून जोरात धडक दिली. या धक्क्यामुळे कावेरी नाखवा अक्षरश: हवेत उडाल्या आणि थेट बीएमडब्ल्यू कारच्या बॉनेटवर आदळल्या. प्रदीप नाखवा बाईकसह खाली कोसळले.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

वरळीतल्या त्या भयंकर अपघाताच्या आधी काय काय घडलं? काय होता घटनाक्रम?

मिहीर शाहनं तिथल्यातिथे कार थांबवली असती, तर कदाचित कावेरी नाखवा वाचल्या असत्या, अशा प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत. मिहीरनं कावेरी नाखवा बॉनेटवर असतानाच बीएमडब्ल्यू कार आणखी जवळपास दोन किलोमीटर चालवत नेली. शेवटी कावेरी नाखवा बॉनेटवरून खाली पडल्या आणि मिहीरनं तिथून कारसह पोबारा केला. यावेळी मिहीरसोबत त्यांचा कारचालकही होता. काही स्थानिकांनी कावेरी नाखवा यांना रुग्णालयात दाखल केलं खरं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

राजेश शाह यांना अटक

या प्रकरणात आधी चौकशीसाठी राजेश शाह यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना अटक करण्यात आली आहे. मुलगा मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

अपघातावेळी नेमकं काय घडलं?

मिहीर अपघाताआधी जुहूमधल्या बारमध्ये मद्यप्राशन करत होता. तिथून गोरेगावला घरी गेल्यानंतर पुन्हा बीएमडब्ल्यू कारमध्ये तो चालकासह ड्राईव्हवर निघाला. वरळी भागात आल्यानंतर त्यानं चालकाकडून कार स्वत: चालवायला घेतली. एट्रिया मॉलजवळ नाखवा दाम्पत्याला त्यानं धडक दिली. यावेळी चालक त्याच्या बाजूला बसला होता आणि मिहीर स्वत: कार चालवत होता. अपघातानंतर मिहीर शाह फरार आहे. त्याचा मोबाईल फोनदेखील बंद आहे. अपघातानंतर मिहीर त्याच्या प्रेयसीला भेटल्याचंही सांगितलं जात असून पोलिसांनी त्याच्या प्रेयसीची चौकशी सुरू केली आहे.

वरळीत भरधाव BMW वाहनानं महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्यानंतर मृत्यू, वाहन मालक शिंदे गटाचा पदाधिकारी ताब्यात

कोण आहेत राजेश शाह?

मिहीरचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. त्यांचा बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. तसेच, गोरेगाव भागात त्यांचं घर असून मिहीर शाह तिथेच राहातो. मात्र, या अपघातानंतर तो फरार आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री व शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी कायद्यासमोर सर्व समान असल्याचं सांगत योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.