आपण गावाला जाण्यास निघालो किंवा गावाहून मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो की हमखास ओळखीची मंडळी एखादी वस्तू किंवा खाऊ त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे देतात. आपण हे काम कोणताही मोबदला न घेता स्वखुशीने करतो. कारण त्यात नात्यांचा ओलावा असतो. पण जर एखादेवेळेस मित्राच्या मित्राने त्याच्या मित्राला काही तरी सामान पोहोचवण्यास सांगितले तर आपण ते काम कसे टाळता येईल याचा प्रयत्न करत असतो. या कामाचा आपल्याला काही मोबदला मिळाला तर आपण हे काम नक्कीच आनंदाने करू. कुणाच्या राहिलेल्या किंवा कुणाला भेट म्हणून द्यायच्या वस्तू आपण प्रवास करत असलेल्या मार्गावर असतील तर त्या पोहोचवण्याचे काम करून आपण पैसे कमवू शकतो. ही संधी www.beckfriends.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वासाठी खुली झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा लघु उद्योजकांसाठी ही चांगली संधी असल्याचा दावा ही सेवा सुरू करणारे दीप मल्होत्रा, मयांक बसू, राहुल बसू आणि शिखा पांडे यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा