मुंबईः वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्याला रोखले असता त्याने पोलिसावरच हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी मालाड परिसरात घडला. यावेळी आरोपीने पोलिसाच्या डोक्यात काठी मारली. या हल्ल्यानंतर पोलीस खाली कोसळला. आरोपीविरोधात याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहाय्यक फौजदार माणिक सावंत (५२) मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून ते मालाड काचपाडा परिसरास गस्तीवर होते. त्यावेळी इतर दोन पोलिसही त्यांच्यसोबत मोबाइल व्हॅनमध्ये उपस्थित होते. त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पाहणी करण्यासाठी सावंत तेथे गेले असता एक व्यक्ती वाहने विनाकारण अवडत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सावंत यांनी त्याचा हात पकडून बाजूला नेले व त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्यावेळी तो तरुण संतापला. त्याने तुला मारून टाकतो, असे बोलून बाजूला पडलेली काठी घेतली व सावंत यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे सावंत बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्याबरोबर तो तरुण काठी तेथेच फेकून पळून गेला. सावंत यांच्यासोबत असलेले दोन पोलीस तेथे आले. त्यांनी सावंत यांना तात्काळ मालाड येथील तुंगा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सावंत यांच्यावर उपचार केले. त्यावेळी ते शुद्धीत आले.

हेही वाचा – मुंबईः खंडणीच्या गुन्ह्यांत सहभागी आरोपीला अटक

हेही वाचा – आर्थर रोड कारागृहातील एका बराकमध्ये ५० ऐवजी २०० हून अधिक कैदी, कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त

याप्रकरणी पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी आरोपीचे नाव अरुण हरिजन असून तो काचपाडा परिसरातील रहिवासी असल्याचे समजले. याप्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, १३२, ३५२ अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai youth who obstructed traffic attacked police mumbai print news ssb