समाजात वैद्यकीय उपचाराबाबत अंधश्रद्धेचा परिणाम

मुंबईत साथीच्या आजारांबरोबरच काविळीची लागण झालेल्या रुग्णांचीही संख्या सर्वाधिक आहे. मात्र, काविळीवर रुग्णालयांतून उपचार घेण्याऐवजी बहुतांश जण कावीळ उतरवणाऱ्या कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेल्या वैदूंकडून उपचार करून घेणे पसंत करीत आहेत. यामुळे अजूनही समाजात वैद्यकीय उपचाराबाबत कमालीची अंधश्रद्धा असल्याचे समोर येत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पावसाळा सरला असला तरीही मुंबईत काविळीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. काविळीबाबत अनेक समज-गैरसमज असून याचा पगडा ग्रामीण जनतेबरोबरीनेच शहरी जनतेवरदेखील दिसून येतो. कावीळजन्य लक्षणे घेऊन मुंबईतील अनेक जण डॉक्टरांच्या दवाखान्याऐवजी कावीळ उतरवणाऱ्या वैद्याची वाट धरत आहेत. तर शहरी झोपडपट्टय़ांमधीलही अनेकांचा वैद्याकडे ओढा दिसून येत आहे.

वडाळ्याच्या रफी अहमद किडवाई मार्गावर बसणाऱ्या वैद्यांकडे संध्याकाळी रांगच लागल्याचे चित्र दिसते. कावीळचे निदान करण्यासाठी हे वैदू अनेक भलत्यासलत्या पद्धती वापरतात. कधी चुन्याच्या पाण्यात रुग्णाचे हात बुडवून पाणी पिवळे झाले की कावीळ झाल्याचे सांगून त्याने बनवलेले झाडपाल्याचे औषध दिले जाते, तर कधी रुग्णालयातून मान्यताप्राप्त डॉक्टरने दिलेली औषधे न खाता आपणच दिलेले औषध खाण्याचे सल्ले दिले जातात.

ही औषधे बनविण्यासाठी काय वापरले जाते, ही माहिती उघड करण्यास हे वैदू तयार नसतात. सध्या तरी या पद्धतीने निदान करून औषध देणाऱ्या वैद्यांवर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येत आहे.

३० ते ३५ रुपयात औषध

वडाळा, लालबाग, परेल, सायन, शिवडी अशा अनेक ठिकाणी हे वैद्य आपली दुकाने मांडून बसले आहेत. निदानाची ही पद्धत फार वर्षांपासून सुरू आहे. शिवाय त्यांच्यामार्फत दिले जाणारे काढे, चूर्ण हे आयुर्वेदिक समजून आणि ३० ते ३५ रुपये एवढय़ा कमी दराने मिळत असल्याने अशा वैद्यांकडे येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढते आहे. अशा पद्धतीचे झाड-पाल्याच्या औषधाचे सेवन करून त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याने रुग्णालयाचा आसरा घेणारे अनेक रुग्ण मुंबईत दिसतात. दादरमध्ये राहणारे अभिषेक पाष्टे यांना काविळीचे लक्षण जाणवल्यानंतर त्यांनी अशाच औषधांचे सेवन केले. पण पाच दिवसांनंतर प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याउलट सायनच्या कविता जोगळे यांना अशा वैद्याच्या औषधांनी बरे वाटत असल्याचे सांगितले.

मुळातच अशा भोंदू वैद्यांकडून केल्या जाणाऱ्या कावीळ निदानाच्या या सर्व पद्धतींना वैद्यकीय आणि आयुवैदिकशास्त्राचा कोणताही आधार नाही. अशा भोंदू वैद्यांनी दिलेल्या औषधाचे सेवन न करण्याचा सल्ला मी देईन. माझ्या दवाखान्यातही अगदी शेवटच्या घडीला या भोंदू वैद्यांची औषधे घेऊन बेजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून अशा रुग्णांसाठी योग्य उपचार आणि प्रबोधनाचा मार्ग मी वापरतो.

– डॉ. दिलीप पाटील, साईनाथ क्लिनिक.

Story img Loader