वीज देयक भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार असून भ्रमणध्वनीद्वारे वीज देयक भरण्याची सोय येत्या सहा महिन्यात केली जाणार आहे.‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी  ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत ही माहिती दिली.
‘बेस्ट’वर १३ कोटींचा भार
‘सीएनजी’च्या दरात केलेल्या वाढीचा फटका आता ‘बेस्ट’लाही बसणार आहे. यामुळे ‘बेस्ट’ प्रशासनावर दरवर्षी १३ कोटी सहा लाख रुपयांचा जादा भार पडणार आहे. ‘बेस्ट’कडे १,३५६ बसगाडय़ा डिझेलवर तर २,९७१ बसगाडय़ा ‘सीएनजी’वर चालणाऱ्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये या विषयावरून बैठकीत  खडाजंगी झाली. दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाने ‘बेस्ट’ला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.

Story img Loader