घराच्या सुरक्षिततेच्या बाबतीत इतर भारतीयांच्या तुलनेत मुंबईकर जास्त जागरूक असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. एक-चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांच्या बाबतीत घरफोडीचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. सुरक्षाविषयक उत्पादने बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी गोदरेज सिक्युरिटी सोलुशन्सने (जीएसएस) आज त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून आढळून आलेले निष्कर्ष जाहीर केले. घर व मौल्यवान वस्तू यांच्या सुरक्षेच्या बाबतीत भारतातील विविध शहरांमधील लोकांच्या काही अतिशय चांगल्या तर काही असुरक्षित सवयी यातून दिसून येतात.
जवळपास एक-चतुर्थांश मुंबईकरांच्या बाबतीत घरफोडी करण्याचे प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना अशीही काळजी वाटते की तसे पुन्हा होऊ शकते. त्यामुळे फक्त ३६.८% मुंबईकर त्यांच्या मौल्यवान वस्तू घरातील कपाटांमध्ये ठेवतात तर राष्ट्रीय पातळीवर याची सरासरी ५२.४% पेक्षा जास्त आहे. मुंबईकर खूप जागरूक असतात असेही आढळून आले आहे. ५८.७% मुंबईकर १५ मिनिटांसाठी जरी बाहेर पडायचे असेल तरी घराचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद करतात. ही सवय असण्याची राष्ट्रीय सरासरी फक्त ३७.२% आहे. कधीही न झोपणाऱ्या या शहरातील ८१% नागरिक असे मानतात की त्यांचे पैशाचे पाकीट हरवू शकते तर इतर शहरांमधील फक्त ५१.८% लोकांनाच तसे वाटते. मुंबईकरांची त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवयदेखील बऱ्याच जास्त प्रमाणात आहे. ६९% मुंबईकर आपल्या घराच्या किल्ल्या शेजाऱ्यांकडे ठेवण्याची जोखीम घेतात तर देशातील इतर सर्व शहरांमध्ये फक्त ४७% लोक असे करतात.
– सर्वेक्षणातून हाती लागलेले महत्त्वाचे निष्कर्ष :
- अर्ध्यापेक्षा जास्त (५८.७%) मुंबईकर असे आहेत जे अगदी १५ मिनिटांसाठी जरी बाहेर जात असले तरी घराचा बाहेरील दरवाजा कुलूप लावून बंद करतात, ही सवय असण्याची राष्ट्रीय सरासरी फक्त ३७.२% आहे.
- ८२.५% मुंबईकर ३०-४५ मिनिटांसाठी बाहेर जायचे असल्यास घराचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद करतात, याची राष्ट्रीय सरासरी ६६.२% आहे.
- ६९% मुंबईकर आपल्या घराच्या किल्ल्या शेजाऱ्यांकडे ठेवण्याची जोखीम घेतात तर देशातील इतर शहरांमधील फक्त ४७% लोक असे करतात.
- एक-चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांच्या बाबतीत घरफोडीचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत.
- ८१% मुंबईकरांना त्यांचे पैशाचे पाकीट हरवू शकते असे वाटते तर इतर शहरांमध्ये असे वाटणारे लोक फक्त ५१.८% आहेत.
- फक्त ३६.८% मुंबईकर त्यांच्या मौल्यवान वस्तू घरातील कपाटात ठेवतात तर राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण सरासरी अर्ध्यापेक्षा जास्त (५२.४%) आहे.