मुंबई : मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. मागील दोन – तीन दिवसांपासून पहाटे गारवा असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा सामना करावा लागत आहे. सांताक्रूझ येथे मंगळवारी ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सरासरीपेक्षा काही अंशानी अधिक होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सांताक्रूझ येथील कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा मंगळवारी १.८ अंशानी अधिक होते. तर, कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मागील दोन दिवसांपासून पहाटे गारवा असला तरी दुपारी मात्र असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पुढील दोन – तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच किमान तापमानाचा पारा पुढील काही दिवस १५ ते २० अंशादरम्यान राहील. यामुळे पहाटे, तसेच मध्यरात्री हवेतील गारवा कायम राहणार आहे.

हेही वाचा…चेंबूरमध्ये सोनेरी कोल्ह्याचा तरुणावर हल्ला

दरम्यान, राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातील घट मंगळवारीही कायम होती. नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती पुढील एक – दोन दिवसांत तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…‘टेकफेस्ट’ला मुंबईसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचीही हजेरी, पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी दिली भेट; विविध प्रकल्प लक्षवेधी

मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत

मुंबईची हवा मंगळवारीही ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा निर्देशांक १६९ इतका होता. शिवाजी नगर आणि नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील निर्देशांक अनुक्रमे २५३, ३०० इतका होता. तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली आहे.