लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहूल लागली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या असून मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

Construction of elevated deck at Khar Road of Western Railway
पश्चिम रेल्वेच्या खार रोड येथे ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Opportunities in the field of radiation research at Mumbai University
मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात संधी!
Tight police security for swearing-in ceremony of Mahayuti government
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
Medical colleges in state will be inspected soon
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करणार
BEST launches special bus service on Mahaparinirvan Day
बेस्ट उपक्रमाकडून महापरिनिर्वाण दिनी विशेष बस सेवा

बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीची चाहूल लागली होती. उपनगरांतील किमान तापमान नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून २० अंशाखाली नोंदले जात होते. यामुळे रात्री, तसेच पहाटे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. तसेच वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २४.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

आणखी वाचा-राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करणार

दरम्यान, डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळाचा परिणाम

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे थंडीत घट झाली आहे. या चक्रीवादळाचा एकूणच वातावरणावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात तापमानातील वाढ कायम राहून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईत मात्र संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मात्र, पाऊस पडणार नाही, असे हवामान विभगाकडून सांगण्यात आले.