लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हात फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

ऑक्टोबर हिटमध्ये उष्णता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांना उलटी होणे, चक्कर येणे, निर्जलीकरण होणे, बेशुद्ध पडणे, उष्माघाताचा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईत आर्द्रता अधिक असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईकरांना त्याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. उष्णतेमुळे नागरिकांनी पुढील दिवसांमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई: नोव्हेंबरपासून मेट्रो ३ च्या चाचण्या

वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून मुंबईत उकाडा वाढत आहे. या वाढत्या उन्हात सातत्याने काम करणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, लघुशंका करताना जळजळ होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यासारखे त्रास होण्याची शक्यता आहे. अनेकदा शरीराचे निर्जलीकरणही होते. त्यामुळे वाढती उष्णता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडणे टाळावे, बाहेर जायचे असल्यास डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची बाटली कायम जवळ बाळगावी, अधिकाधिक फळे खावीत, जेणेकरून वाढत्या उन्हाचा त्रास फारसा होणार नाही, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले. उन्हामुळे थकवा येणे, गळून जाणे, चक्कर येणे, ताप येणे व पराकोटीच्या स्थितीत उष्माघात होणे, निर्जलीकरण होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.