वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. काम बराच काळ रेंगाळल्याने प्रकल्पाचा खर्चही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. सुधारित अंदाजानुसार तो ४८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच मेट्रोच्या प्रवासी भाडेवाढीचा मुद्दा ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि राज्य सरकारमध्ये तापला आहे. २००६ मध्ये या मार्गाच्या कामाचे उद्घाटन झाले. त्यानंतर २००८ मध्ये पूर्ण जोमाने काम सुरू झाले. यानंतर मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याचे तब्बल सहा मुहूर्त वेळोवेळी जाहीर झाले. ते असे – १. जुलै २०१० २. सप्टेंबर २०१० ३. जुलै २०११ ४. मार्च २०१२ ५. नोव्हेंबर २०१२ आणि ६. मे २०१३. पण हे मुहूर्त गाठण्यात ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ ही कंपनी साफ अपयशी ठरली. त्यानंतर पहिला टप्पा सप्टेंबर २०१३ मध्ये आणि दुसरा टप्पा डिसेंबर २०१३ मध्ये असे आणखी दोन मुहूर्त जाहीर करण्यात आले. पण ते यशस्वी ठरले नाहीत. अशारितीने आतापर्यंत आठ मुहूर्त जाहीर झाले आणि अजूनही मेट्रो कधी धावणार याची प्रतीक्षा मुंबईकर करत आहेत. मात्र, त्याचे उत्तर काही मिळत नाही.

Story img Loader