मुंबई : मुंबईच्या हवेची गुणवत्ता सध्या ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीमध्ये आहे. थंड हवेत प्रदूषके साचून राहत आहेत. समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली असली तरी मुंबईतील बहुतांश केंद्रावर ‘वाईट’ हवेची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी सायंकाळी मुंबईच्या एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९४ इतका होता. सायंकाळी ५ च्या सुमारास नेव्ही नगर कुलाबा ३०३, वरळी २२९, शिवाजीनगर २३४, माझगाव २७३, भायखळा येथे २४२, बोरिवली २२८, चेंबूर २७०, देवनार २७३ आणि कांदिवली येथे २०५ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक होता. म्हणजेच नेव्ही नगर -कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची, तर इतर केंद्रावर हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली. वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला, मालाड आणि शिवडी येथे हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ स्वरूपाची होती. सर्व केंद्रांवर पीएम २.५ चा स्तर मोठ्या प्रमाणावर घसरला होता.

हेही वाचा…विदेशी महिला व तिच्या मैत्रीणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

मुंबईच्या किमान तापमानात मागील तीन – चार दिवसांपासून घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात धुके होते. त्यातच वाऱ्यांचा वेग मंदावल्याने हवेत प्रदूषके साचून राहिली. काही भागात बुधवारी धुरके होते. मुंबईच्या कमाल तापमानात फारशी घट झाली नसली तरी किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. वारेही संथ गतीने वाहत असून, वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रताही आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम मुंबईच्या हवा गुणवत्तेवर झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे सुनील कांबळी यांनी दिली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३०.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील किमान तापमान अनुक्रमे २०.२ आणि १५.५ अंश सेल्सिअस इतके होते.