मुंबई : दिवाळीच्या दिवसांत झालेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा पहिल्या दिवसापासून ढासळला होता. पहिल्याच दिवशी काही भागात अतिवाईट ते वाईट हवेची नोंद झाली. दरम्यान, दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही. याउलट, सोमवारी मुंबईच्या हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच नोंदला गेला. सलग पाच दिवस शहरात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यामुळे, अशुद्ध हवेचा मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली असतानाच, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या हंगामातील हवा प्रदूषणाने उच्चांक गाठला. फटाक्यांचा धूर गुरुवारी सायंकाळपासून वाढल्याने मुंबईतील अनेक भागात धुरके पसरले होते. शिवडी, वांद्रे, कांदिवली या परिसरात अतिवाईट हवेची नोंद झाली होती. तर, इतर भागात ती वाईट ते मध्यम श्रेणीत नोंदली गेली. दिवाळीनंतर मुंबईच्या हवेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारी मुंबईची हवा गुणवत्ता ह्यमध्यमह्ण श्रेणीतच नोंदली गेली. मुंबईचा हवा निर्देशांक सोमवारी १५७ इतका होता. तसेच शिवडी, वांद्रे आणि मालाड या भागात वाईट हवेची नोंद झाली. दिवाळीच्या दिवसांत देखील याच भागातील हवेचा दर्जा सातत्याने खालावलेला होता. दरम्यान, यामध्ये सुधारणा होऊन सोमवारी येथील हवेचा दर्जा समाधानकारक किंवा मध्यम श्रेणीत नोंदला न जाता वाईट श्रेणीतच नोंदला गेला. येथील हवा निर्देशांक सायंकाळी सातच्या सुमारास अनुक्रमे २६३, २४३,२३५ इतका होता.

हेही वाचा…बुद्धविहारात मतांसाठी मनधरणी, लोकसभेतील अनुभवानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची सावध भूमिका

पावसाच्या काळात हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र, पावसाळा सरल्यानंतर धूलिकणांचे हवेतील प्रमाण वाढते. त्याशिवाय, फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही हवेची गुणवत्ता खालावते. हवेच्या गुणवत्ता निकषानुसार, ५० पर्यंत निर्देशांक असल्यास हवेची गुणवत्ता चांगली, तर १०० पर्यंत समाधानकारक मानली जाते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही आतषबाजी करण्यात आली. मोठ्या माळा, आवाजी फटाक्यांसह शोभेच्या फटाक्यांचे प्रमाण जास्त होते. फटाक्यांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या आतषबाजीमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais air quality worsened from diwali fireworks displays on first day itself mumbai print news sud 02