सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. भाविक मोठया संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये जात आहेत. मागच्या आठवडयात गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच वांद्रा पूर्वेला खेरवाडी येथील गणेश मंडपात एक अनपेक्षित पाहुणा आला होता. या पाहुण्याला पाहून अनेकांची भितीने गाळण उडली. काही क्षणात मंडपात गोंधळ सुरु झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा पाहुणा होता ‘अजगर’. २८ ऑगस्टला गुरुवारी ही घटना घडली. मंडप बांधण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा एक गुच्छ ठेवलेला होता. त्यामध्ये हा अजगर होता. मंडपाजवळ काही मुले खेळत होती. त्यांनी आधी दोरी सरकताना पाहिली. नीट निरखून पाहिल्यानंतर ही सरकणारी दोरी म्हणजे अजगर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर इथे एकच गोंधळ सुरु झाला.

आरडाओरडा सुरु असल्यामुळे हा अजगर बाहेर आला असावा. गणेशोत्सवाची तयारी पूर्ण जोरात सुरु असताना ही घटना घडली असे उत्सव आयोजन समितीमध्ये असलेल्या अनिकेत वेंगुर्लेकर याने सांगितले. अजगराची सुटका करण्यासाठी स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केले. एका व्यक्तीने पोलिसात असलेल्या त्यांचे नातेवाईक योगेश साटम यांना फोन लावला. योगेश साटम तिथे येण्याआधी त्याचा सहकारी हृतिक सावंत (१९) तिथे पोहोचला व परिस्थिती हाताळली. योगेश साटमने नंतर अजगराला पकडले व त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.