तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडली असून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. नागपूर-मुंबई दुरांतो अडकल्याचे वृत्त आहे. सकाळीच झालेल्या या गोंधळाने ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
दोन मोठ्या गाड्या अडकून पडल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडली आहे. सर्व जलद गाड्या दिवा ते ठाणे दरम्यान धीम्या गतीच्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. बंद पडलेली मालगाडी दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Story img Loader