UnderGround Metro 3 : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिका लवकरच मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रभारी विनोद तावडे यांनी यासंदर्भात एक्स खात्यावरून माहिती दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांच्या सुरळीत जनजीवनाची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलैपासून सुरू होणार आहे. यामुळे शहर अधिक वेगाने पळू शकेल”, अशी पोस्ट विनोद तावडे यांनी केली आहे.

एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीच्या भूमिगत मेट्रो ३ मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेतले. हे काम पाच वर्षांत म्हणजे २०२१ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक बाबी, आरे कारशेड वाद, पुनर्वसन आदी कारणांमुळे एमएमआरसीला हा मुहूर्त साधता आला नाही. परिणामी प्रकल्पाच्या पूर्णत्वाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी मुंबईकरांना प्रचंड प्रतिक्षा करावी लागली.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक (सिव्हिल), सुयश त्रिवेदी यांनी लोकसत्ताशी बोलताना या मेट्रोबद्दल माहिती दिली होती. भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या अनोख्या स्टेशनबद्दलची सविस्तर माहिती देताना ते म्हणाले होते की, बीकेसीमधील हे स्टेशन भारतातील सर्वात मोठं आणि जगातील सर्वाधिक लांबीच्या स्टेशन्सपैकी एक असणार आहे. तसेच या स्टेशनवर अनेक गाड्या येऊन त्या टर्मिनेट होऊन मागे जाणार आहेत, त्यामुळे हे स्टेशन एखाद्या जंक्शनप्रमाणे काम करणार आहे.

जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचं स्टेशन –

भूमिगत मेट्रो रेल्वेच्या स्टेशनची लांबी जवळपास ४७५ मीटर आहे, तर इतर मेट्रोची स्टेशनं ही साधारणपणे २०० ते २५० मीटरची असतात, असंही त्रिवेदी यांनी त्यावेळी सांगितलं होतं. या स्टेशनसाठी वेगवेगळे टनेल तयार करण्यात आले असून ते बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन हे स्टेशन बनविण्यात आलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे येथील बोगद्यातून दोन रेल्वे एकाच वेळी जाऊ शकतात. तसेच बीकेसी स्टेशन बनविताना प्रवाशांना जास्त चालावं लागणार नाही, त्यांना रस्ता क्रॉस करण्याची गरज भासणार नाही याची काळजीदेखील घेण्यात आल्याचं त्रिवेदी यांनी सांगितलं.

दोन गाड्या एकाच वेळी पार्क करता येणार :

या स्टेशनमध्ये दोन रेल्वे एकत्र पार्क केल्या जाऊ शकतात. तसेच या स्टेशनमध्ये अनेक ठिकाणांहून येणाऱ्या गाड्यांच्या मार्गिका एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. शिवाय प्रवाशांना एकदा मेट्रो स्टेशनमध्ये आल्यानंतर तिथून बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, यासाठी सर्व गाड्या जोडल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावर बुलेट ट्रेनचे स्टेशन आहे. भविष्यात बीकेसी स्टेशन आणि बुलेट ट्रेन जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारची योजना आखली आहे. दरम्यान, या स्टेशनचं काम प्रगतिपथावर असून लवकरच काही महत्वाच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर या मार्गावरून मेट्रो धावायला सुरुवात होणार असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.