Bomb Threat To Mumbai School : मुंबईतील एका शाळेत बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुंबईतील अंधेरीच्या जोगेश्वरी-ओशिवरा भागातील रायन ग्लोबल स्कूलला ही धमकी देण्यात आली होती. स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली असून परिसराची झडती घेतली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली होती. नंतर जुलैपासून अनेक रुग्णालये, मुंबई विमानतळ, अनेक उड्डाणे आणि अगदी आरबीआय मुख्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या.

अफझल गँगकडून धमकी?

मुंबईच्या रायन ग्लोबल स्कूलमध्ये आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र पोलिसांचा शोध सुरू आहे. ‘अफझल गँग’ म्हणून ओळख असलेल्या एका टोळीने ही धमकी दिली होती. यापूर्वी डिसेंबरमध्ये दिल्लीतील रायन इंटरनॅशनल स्कूलला ईमेलवर बॉम्बच्या धमक्या देऊन लक्ष्य करण्यात आले होते. बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या इतर अनेक शाळांपैकी ही शाळा होती.

दिल्लीत एका अल्पवयीन मुलाला अटक

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीतील ४०० हून अधिक शाळांना पाठवलेल्या खोट्या बॉम्बेच्या धमक्यांवर कारवाई केली होती. धमकी देणाऱ्या ईमेलसाठी जबाबदार असलेल्या एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर केंद्रयी मंत्री पियुष गोयल म्हणाले, सामाजिक सलोखा आणि देशाची प्रगती अस्थिर करणे हे भ्रष्ट मनाचे काम आहे. भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा फुटीरतावादी शक्तींपासून आपण सावध राहिले पाहिजे आणि आपल्याला लढा देण्याची गरज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais ryan global school gets bomb threat police conduct search in jogeshwari oshiwara area sgk