मुंब्रा इमारत दुर्घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुंब्रा येथील जीवनबाग परिसरातील ‘बानो’ कॉम्प्लेक्समधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली शनिवारी रात्री उशिरा आणखी दोन रहिवाशांचे मृतदेह आढळल्याने या घटनेतील मृतांचा आकडा आता तीनवर पोहचला आहे. रविवारी दिवसभर या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीजवळ असलेल्या अरुंद रस्त्यामुळे या कामात काहीसे अडथळे येत होते. दरम्यान, या घटनेप्रकरणी अटकेत असलेले विकासक अखिल शेख आणि शकील शेख या दोघांना ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत्यूच्या दाढेतून सुटका..

शनिवारी रात्री उशिरापर्यंत इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जावेद कुरेशी (२५) आणि मोईन मुस्तान कुरेशी (३५) या दोघांचे मृतदेह आढळले.  या दृर्घटनेआधीच इमारतीमधील २८ कुटुंबे इमारतीबाहेर आल्याने मोठी जीवितहानी टळली होती. असे असले तरी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार रहिवासी अडकल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांच्या बचावासाठी मदतकार्य सुरू होते. चारपैकी हनीफ काझी आणि समीरा काझी या दोन रहिवाशांना शनिवारी दुपारी ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, पण या दुर्घटनेत हनीफ यांचा मृत्यू झाला होता. तर समीरा या महिलेला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान, हनीफ यांच्या मृतदेहावर शनिवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader