नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी जाहीर केले असून त्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे समर्थकांचा वरचष्मा असल्याचे किंवा अगदी ‘टीम मुंडे’ असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची चांगली कामगिरी व्हावी यासाठी नेत्यांच्या छत्रछायेत राहणाऱ्या नेत्यांपेक्षा जनाधार असलेल्या नेत्यांची निवड भाजपच्या सरचिटणीसपदी करण्यात आली आहे आणि सर्व सरचिटणीस  चाळीशीच्या घरातील आहेत. सरचिटणीसपदी असलेल्या रघुनाथ कुलकर्णी यांना नवीन पदाधिकाऱ्यांमधून वगळण्यात आले आहे.
चैनसुख संचेती (बुलडाणा), सुभाष देशमुख ( सोलापूर), आमदार चंद्रकांत पाटील (कोल्हापूर), खासदार रावसाहेब दानवे (जालना), आमदार गिरीष महाजन (जळगाव), आमदार प्रकाश शेंडगे (सांगली), आमदार मंगलप्रभात लोढा (मुंबई), रामदास तडस (वर्धा), प्रकाश मेहता (मुंबई), मनिषा चौधरी (मुंबई), जयप्रकाश ठाकूर (मुंबई), सुरेश खाडे (सांगली), नीता केळकर (सांगली), गोविंद केंद्रे (लातूर) यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.
 माजी नगराध्यक्ष सुजितसिंह ठाकूर (उस्मानाबाद), आमदार जयकुमार रावल (धुळे), माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर (लातूर), आमदार डॉ.रणजित पाटील (अकोला), आमदार प्रा.राम शिंदे (नगर), आमदार संजय भेगडे (पुणे) यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. रवींद्र भुसारी हे संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहतील, तर सहसंघटन चिटणीसपदी सुनील कर्जतकर व डॉ. राजेंद्र फडके यांची नियुक्ती झाली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी आहे.
चिटणीसपदी माधुरी मिसाळ (पुणे), सुनील बढे (जळगाव), अतुल सावे (औरंगाबाद), सीमा हिरे (नाशिक), आमदार चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), योगेश गोगावले (पुणे), निवेदिता चौधरी (अमरावती), विजय गव्हाणे (परभणी), डॉ.भागवत कराड (औरंगाबाद), मेधा कुलकर्णी (पुणे), हरीश मोरे (भंडारा), हरिश्चंद्र भोये (ठाणे), वर्षां भोसले (नवी मुंबई), आर.टी.देशमुख (बीड), जमाल सिद्दीकी (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी शायना एन सी असतील. प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी प्रताप आशर तर अध्यक्षांचे राजकीय सल्लागार म्हणून आमदार सुधाकर देशमुख काम पाहतील. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी स्मिता वाघ यांची नियुक्ती झाली असून मुंडे यांच्या कन्या आ. पंकजा मुंडे-पालवे यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नानाजी शामकुळे अनुसूचित जाती मोर्चाचे तर अशोक नेते हे अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष असतील.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Story img Loader