भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील कार्यक्रमात दिलेल्या कबुलीची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे आणि त्यांना परत निवडणूक लढवून द्यायची का, याचा विचार केला पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी केली.
निवडणुकीसाठी पूर्वी फार खर्च येत नसे. सुमारे २० वर्षांपूर्वी २९ हजार रुपये खर्च करून निवडून आलो, पण गेल्यावेळी निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च करावे लागले, अशी कबुली मुंडे यांनी मुंबईत दिली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख समन्वयक विनय सहस्त्रबुध्दे यांच्या ‘बियॉंड ए बिलियन बॅलट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी ही कबुली दिली. त्यानंतर मुंडे यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून टीका करण्यात येऊ लागली आहे. निवडणूक आय़ोगाने मुंडे यांची कबुली गांभीर्याने घेतली पाहिजे आणि त्यांना परत निवडणूक लढवून द्यायची का, याचाही निर्णय घेतला पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे. सत्यकथन केल्याबद्दल मुंडे यांचे कौतुक करायला हवे, असा उपरोधिक टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.
निवडणुकीसाठी आठ कोटी रुपये खर्च करावे लागले – गोपीनाथ मुंडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा