मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला संपूर्ण पाठिंबा आहे. आíथकदृष्टया दुर्बल असलेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांध्ये आरक्षण द्यावे. मात्र राजकीय आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भाजपाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा अथवा छगन भुजबळ यांचा अजिबात विरोध नाही. मी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. उगाच आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे भासविण्यात येते. ते चुकीचे आहे. मराठा समाजही आज अनेक ठिकाणी हालाखीचे जीवन जगत आहे.

Story img Loader