मुंबई : डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित जाहिरात संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल. अतिप्रखर प्रकाशमान डिजिटल जाहिरात फलकांमुळे रात्री त्रास होत असल्याच्या तक्रारींनंतर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रात्री ११ नंतर डिजिटल जाहिरात फलक सुरू राहिल्यास जाहिरात संस्थेची लाखोंची अनामत रक्कम जप्त केली जाईल.

मुंबईत एकूण १०२७ जाहिरात फलक आहेत. दोन वर्षांपूर्वी पालिकेने जाहिरात फलक डिजिटल करण्याचे धोरण स्वीकारले होते. मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत जाहिरात फलक डिजिटल करण्यास सुरूवात झाली होती. आतापर्यंत मुंबईत ६७ ठिकाणी असे डिजिटल जाहिरात फलक आहेत. या फलकांवर चित्रफिती असतात वा सतत बदलणारी चित्रे असतात. प्रखरतेमुळे हे फलक लक्षवेधी असतात. मात्र काही वर्षांपासून या डिजिटल जाहिरात फलकांबाबत तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे प्रखर प्रकाश त्रासदायक असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. तसेच सतत बदलणाऱ्या चित्रांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. जाहिरात फलकाच्या जवळच्या इमारतींतील रहिवाशांना त्रास होतो अशा तक्रारी येत होत्या.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा >>>मुंबई : कफ परेडमधील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील ४०० मीटर रस्ता मोकळा

डिजिटल जाहिरात फलकांबाबत कठोर नियमावली मुंबई पालिकेच्या नव्या जाहिरात धोरणात अंतर्भूत करण्यात येणार असून लवकरच हे धोरणही जाहीर होणार आहे. मात्र, या जाहिरात फलकांबाबत सध्या जे नियम आहेत त्यानुसार हे फलक रात्री ११ वाजता बंद करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक ठिकाणी ते रात्रभर सुरू असतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा जाहिरात फलकांच्या जाहिरातदारांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिकेने सात परिमंडळांसाठी पथके तयार केली असून रात्री ११ नंतर ही पथके मुंबईत फिरून कुठे डिजिटल फलक सुरू आहे का त्याची माहिती घेतली जाईल. जाहिरात फलक सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याचे ठिकाण निश्चित करण्यासाठी ‘जिओ टॅग’ करून त्याबाबत कळवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने या पथकांना दिले आहेत. फलकांसाठी जाहिरातदारांची अनामत रक्कम २० लाखांपर्यंत असते. शिवाय नियम डावलल्यास परवाना रद्द केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत केवळ ४० फूट लांबी रुंदी असलेल्या जाहिरात फलकांनाच परवानगी दिली जाते. त्यापेक्षा जास्त आकार असलेले जाहिरात फलक अनधिकृतपणे उभे आहेत. घाटकोपरच्या छेडानगर येथील जाहिरात दुर्घटनेनंतर अनधिकृत आणि महाकाय फलकांचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे मुंबईतील जाहिरात फलकांची लांबी, रुंदी जाहिरातदारांनी सागितल्यानुसारच आहे की नाही हे देखील आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासले जाणार आहे.