लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ३ हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये म्हणजेच ५८ टक्के कर संकलन करण्यात पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले आहे. आर्थिक वर्ष मार्चअखेरीस संपत असले तरी मालमत्ता कर भरणा ३१ डिसेंबरपर्यंत करावा लागतो. त्यामुळे पालिकेने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी यंत्रणा सुरू ठेवली आहे. या मुदतीत कर न भरणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. कर वसूलीसाठी पालिकेने यंदाही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यमान आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट्य ६ हजार २०० कोटी रुपये आहे. त्यापैकी २७ डिसेंबरपर्यंत ३ हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये म्हणजेच ५८ टक्के कर संकलन झाले आहे. आर्थिक वर्ष मार्च अखेरीस संपत असले तरी पालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा हा डिसेंबर अखेरीसपर्यंत करावा लागतो. तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांना दोन टक्के दंडाची तरतूद आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरीस करभरणा करणाऱ्यांच्या सोयीसाठी पालिकेने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आणखी वाचा-मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून तर रात्री १० वाजेपर्यंत आणि मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे सुरु राहणार आहेत. कर भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र

सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत आणि मंगळवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहे. तसेच यासंबंधीत अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत.