लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सर्व अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर गेले पाहिजे. त्यामुळे अडीअडचणींची जाणीव होऊन त्यावर योग्य तो तोडगा निघू शकेल. केवळ कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. माहिती तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी प्रत्यक्षस्थळी जाऊन काम करण्यास पर्याय नाही. जे अभियंता नागरिक, लोकप्रतिनिधीसमवेत संवांद साधतात, त्यांना कमी समस्यांना समोर जावे लागते. जे अभियंता तोंडदेखले जातात, त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. त्यामुळे सर्वांनी संवाद साधण्याची कला वृद्धिंगत करावी, अशा शब्दात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका अभियंत्यांची कान उघाडणी केली.

Municipal Commissioner celebrated Diwali with the sweepers
पालिका आयुक्तांची सफाई कामगारांसोबत दिवाळी, कामगारांच्या वसाहतीला सपत्नीक भेट
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
Mumbai Municipal Corporation ready for Mahaparinirvan Day
मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका सज्ज
Marathi Marwadi conflict in Mumbai
Marwadi vs Marathi Conflict : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक, पाणीपुरवठा, इमारत परिरक्षण, नगर अभियंता, वास्तुविशारद, इमारत प्रस्ताव, पर्जन्य जलवाहिन्या विभागातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा-मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका सज्ज

मुंबई महानगरपालिकेचे अभियंते तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. रस्ते, पाणी, वीज, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या या पायाभूत सुविधांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. याचे श्रेय अभियंत्यांना दिले पाहिजे. मात्र, अभियंत्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम केल्यास, नागरिकांशी सुसंवाद साधल्यास अनेक समस्यांवर मात करता येईल आणि समस्यांचे निराकरण सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.

भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात झालेल्या या संवाद मेळ्यास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-मासळी विक्रेत्या महिल्यांच्या शौचालयावर पालिकेचा हातोडा

ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही…

महानगरपालिकेचे सुमारे चार हजार अभियंते मुंबईतील दोन कोटी नागरिकांच्या जीवनास स्पर्श करीत आहेत. मुंबईकर नागरिकांच्या कररूपी पैशांची बचत करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. ऐसपैस अंदाजपत्रक तयार करणे, सल्लागारांवर विसंबून राहणे कटाक्षाने टाळले पाहिजे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणताही ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही. अभियंत्यांनी तारतम्य बाळगायला हवे. विकासकामे दर्जेदार, ठरवलेल्या वेळेत आणि मंजूर अंदाजपत्रकानुसारच झाली पाहिजेत, असा इशाराही गगराणी यांनी यावेळी दिला.