पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दुकानात काम करणारे कामगार विनामुखपट्टय़ा
लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कुर्ल्यामधील एका सुप्रसिद्ध फालुदा दुकानावर पालिकेच्या एल विभागाने सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीत या दुकानातील कामगार विनामुखपट्टय़ा काम करीत असल्याचे आढळून आले. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिके ने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार के ली आहे. याप्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक व दोन कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर पालिके ने प्रतिबंधात्मक नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात के ल्यानंतर दररोज विविध भागांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच अंतर्गत एल विभागाने सोमवारी ही कारवाई के ली. कुर्ला येथील एल. बी. एस. मार्गावरील एका सुप्रसिद्ध फालुदा विक्रे त्याच्या दुकानात रात्री साडेदहा वाजता लोकांची खूप गर्दी असल्याचे आढळून आले होते. तसेच या दुकानात काम करणारे कामगारही विनामुखपट्टय़ा काम करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या दुकानाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी
सांगितले.
याप्रकरणी दुकानाला पूर्वीही इशारा देण्यात आला होता, मात्र तरीही दुकानदारांचे बेजबाबदार वर्तन सुरू होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक सलीम याकू ब चव्हाण व दोन कामगार सितारा शेख व इजहार शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत करोना रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर फे ब्रुवारीपासून करोना प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार पहिली कारवाई एल विभागामार्फतच करण्यात आली होती.
प्रतिबंधित मजल्यावर राहात असूनही घराबाहेर फिरणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सोमवारी एका फालुदा विक्रे त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये के वळ गुन्हा दाखल न करता पुढील कारवाई करण्याची विनंती आम्ही पोलिसांना के ली असून दंड आणि तीन महिने कारवासाची तरतूद कायद्यात आहे, अशी प्रतिक्रिया एल विभागाचे साहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी दिली. लोकांनी आपले बेजबाबदार वर्तन थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या जे रुग्ण सापडत आहेत ते इमारतीतील आहेत. विशेषत: कु र्ला पूर्वेकडील नेहरूनगरमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. इमारतीत राहणारा वर्ग सुशिक्षित असूनही आपली कर्तव्ये विसरून बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे ही कारवाई करावी लागत असल्याचेही ते म्हणाले.