मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरीमधील वर्सोवा परिसरात सुरू करण्यात आलेली अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई गेल्या १५ दिवसांपासून थंडावली आहे. महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या कारवाईनंतर मध्येच सहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र बदलीनंतर १५ दिवस झाले तरी अद्याप नवीन सहाय्यक आयुक्तांनी पदभार स्वीकारला नाही. तसेच गेल्या १४ दिवसांपासून कारवाई थंडावली आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

अंधेरी पश्चिमेला असलेल्या वर्सोवा परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महानगरपालिका प्रशासनात सध्या चांगलाच गाजत आहे. अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात व दलदलीच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. या बांधकामांवर कारवाई करण्याकरीता वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एका अभियंत्याला निलंबित केले. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार वर्सोवामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी एक विशेष पथकही नेमण्यात आले.

wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
Tukaram mundhe
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे मंत्रालयाकडून आदेश!
Action of encroachment removal teams on food carts mumbai
खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाईचा बडगा; अतिक्रमण निर्मूलन पथकांची कारवाई
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
domestic gas News
Annapurna Yojana: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत मिळणार?
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
neet student marathi news
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट

हेही वाचा >>>खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाईचा बडगा; अतिक्रमण निर्मूलन पथकांची कारवाई

या पथकाने कारवाई करून तीन अनधिकृत इमारती पाडल्या. ही कारवाई सलग काही दिवस सुरू होती. त्यातच मध्येच महानगरपालिका प्रशासनाने अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेचा भाग असलेल्या के पश्चिम विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची १४ जून रोजी तडकाफडकी बदली केली. त्यांना वडाळा, शीवचा भाग असलेल्या एफ उत्तर विभागात पाठवण्यात आले. राजकीय हेतूने त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. चौहाण यांच्या बदलीला आता १५ दिवस झाले असून तेव्हापासून वर्सोवा परिसरातील कारवाई पूर्णतः थंडावली आहे. त्यामुळे या कारवाईमागे आणि बदलीमागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चौहाण यांच्या जागी एफ उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, त्यांनी अद्याप या विभागाची सूत्रे स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे यावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहे.