नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी येथे केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या १११ तर औरंगाबाद पालिकेच्या ११३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. ८ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल, त्यानंतर लगेचच नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
१० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. तर ११ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. तसेच मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. दोन्ही महापालिकांमध्ये २२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. तर २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, असे सहारिया यांनी या वेळी जाहीर केले. या निवडणुकीसाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील. छाननीच्या वेळी मूळ जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तपासण्याकरिता सादर करावे लागेल. निवडणुकीचा
निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल.
औरंगाबाद पालिकेसाठी २२ एप्रिल रोजी मतदान
नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
आणखी वाचा
First published on: 23-03-2015 at 05:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation election declared for navi mumbai aurangabad