लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या २८ बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. नियमांचे अनुपालन केले नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

मुंबईतील वातावरणाचा स्तर बिघडत असून हवेतील प्रदूषणातही वाढ झाली आहे. वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये पथकांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून पालिकेच्या पथकाने ८६८ बांधकामांच्या ठिकाणी पथकांनी भेटी दिल्या आहेत. त्यात नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण २८ बांधकामांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबईतील वायू प्रदूषण हे मुख्यत: बांधकामामुळे होत असते. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणते नियम पाळावे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे महापालिकेने गेल्यावर्षीच जाहीर केली होती. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांनीही प्रयत्न करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या नियमांचे पालन होते आहे का, यावर देखरेख करण्यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाची पाहणी करत आहेत. तसेच, कामाच्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन दिलेल्या मुदतीत करावे म्हणून लेखी सूचनाही दिली जात आहे.

महापालिकेच्या पथकाने एका दिवसात मुंबईतील ८६८ बांधकाम प्रकल्प स्थळांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या २८ बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित बांधकाम प्रकल्प स्थळांनाही भेट देण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. तसेच, महानगरपालिकेचे संबंधित इतर विभाग देखील ‘ऑटो डीसीआर’ सारख्या ऑनलाईन प्रणालीतून बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना देण्यात येत आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

आणखी वाचा-विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

महानगरपालिकेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची तातडीने आणि दिलेल्या वेळेत अंमलबजावणी करावी अन्यथा बांधकाम थांबवण्याची नोटीस देणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यांसारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

Story img Loader