मुंबई : मुंबई महापालिकेतील दुय्यम आणि सहाय्यक अभियंता संवर्गासाठी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता प्रशासनाने दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गासाठी ९ मार्च रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलली आहे.
ही परीक्षा येत्या १५ दिवसांमध्ये घेण्याचे नियोजित असून परीक्षेची सुधारित तारीख निश्चित झाल्यानंतर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण ६९० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा कालावधी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे.