मुंबई : एफ दक्षिण विभागातील फॉसबेरी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या रे रोड बीपीटी गोदामानजीकच्या जलवाहिनीतून गळती होत होती. महापालिकेने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवारी मध्यरात्री पूर्ण केले. त्यामुळे शिवडी परिसरातील पाणीपुरवठा मंगळवारी पहाटेपासून पूर्ववत करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फॉसबेरी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या रे रोड बीपीटी गोदामानजीकच्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून सोमवारी अचानक गळती सुरू झाली. संबंधित जलवाहिनीतून गळती होत असल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या जलअभियंता खात्यातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.

हेही वाचा…अधोविश्व सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या झाल्या अधिक सराईत

या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामात तांत्रिक अडथळे येत होते. त्यामुळे संपूर्ण दुरुस्तीचे काम मनुष्यबळाचा वापर करून पूर्ण करण्यात आले. या गळतीमुळे एफ दक्षिण विभागातील शिवडी पूर्व, दारूखाना, इंदिरा नगर तसेच आसपासच्या परिसरात सोमवारी सायंकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दुरुस्तीच्या कामामुळे शिवडीतील आंबेवाडी व दत्ताराम लाड मार्ग येथे मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ६.४५ या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, कामगारांनी सोमवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे या भागाला मंगळवारी पहाटे पाणीपुरवठा करणे शक्य झाले.