BMC Officers at Narayan Rane’s Juhu Bungalow : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेचे आठ अधिकारी सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहचले आहेत. तर, दुसरीकडे राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोसबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. नारायण राणे हे स्वत: बंगल्यात उपस्थित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती. 

Live Updates
13:24 (IST) 21 Feb 2022
माध्यमांना काहीही प्रतिक्रिया न देता मुंबई महापालिकेचं पथक माघारी फिरलं

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर सकाळी दाखल झालेलं मुंबई महापालिकेच्य अधिकाऱ्याचं पथक, दुपारी पाहणी करून बंगल्याच्या बाहेर पडलं. परत जाताना माध्यमांना या अधिकाऱ्यांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

13:12 (IST) 21 Feb 2022
बंगल्याची पाहणी करून महापालिकेचं पथक बाहेर पडलं

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दाखल झालेलं मुंबई महापालिकेचं पथक बंगल्याची पाहणी करून बाहेर पडलं आहे.

12:03 (IST) 21 Feb 2022
“माझ्या बंगल्याला नोटीस देता, पण ठाकरे यांच्या मातोश्री-२ या बंगल्यात” ; राणेंनी केलं होतं

राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावरून मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजाविताच राणे यांनी ‘मातोश्री’तील चौघांना ‘ईडी’ची नोटीस बजाविली जाणार असल्याचे जाहीर केले होते. हा वाद सुरू असतानाच राणे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा शिवसेनेवर हल्ला चढविला. माझ्या बंगल्याला नोटीस देता, पण ठाकरे यांच्या मातोश्री-२ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का, असा सवाल राणे यांनी केला होता.

11:33 (IST) 21 Feb 2022
महापालिकेचे पथक राणेंच्या बंगल्यात पोहचलं आहे

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात मुंबई महापालिकेचे पथक दाखल झाले आहे. आता या बंगल्यावर कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

11:32 (IST) 21 Feb 2022
समुद्राच्या ५० मीटर क्षेत्रात हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार

सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन समुद्राच्या ५० मीटर क्षेत्रात हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेकडे केली होती. तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पालिकेला स्मरणपत्रही पाठविले होते. त्यानुसार पालिकेने या बंगल्याची पाहणी केली.

11:26 (IST) 21 Feb 2022
माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल

माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.

11:25 (IST) 21 Feb 2022
केंद्रीयमंत्री नारायण राणे स्वत: जुहू येथील बंगल्यात हजर

महालापालिकेकडून कारवाईची शक्यता असताना, केंद्रीयमंत्री नारायण राणे हे स्वत: त्यांच्या जुहू येथील अधीश या बंगल्यात हजर आहेत.

11:25 (IST) 21 Feb 2022
फडणवीसांची प्रतिक्रिया

जे सुडाचं राजकारण सरकारला करायचं आहे, ते करावं. न्यायालय आहेत ते योग्य तो निर्णय घेतील असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

11:22 (IST) 21 Feb 2022
नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

महापालिकेकडून बंगल्यावर कारवाई केली जाणार असल्या पार्श्वभूमीवर, नारायण राणेंच्या बंगल्या बाहेर कुठलाही अनुचित प्रकार किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

11:20 (IST) 21 Feb 2022
नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईसाठी महापालिकेच्या हालचाली सुरू

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेचे आठ अधिकारी सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहचले आहेत.

Story img Loader