मुंबईतील रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार पालिकेत सध्या सुरू आहे.
रस्ते, पदपथ, गल्ल्या, चौक, मैदाने, उद्याने यांच्या नामकरणासाठी पालिकेचे धोरण असून त्याआधारेच नामकरण केले जाते. मात्र रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना नावे देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या संदर्भात सर्वसमावेशक असे एक धोरण निश्चित करावे. त्यामुळे रुग्णालये आणि मंडयांना भारतीय व्यक्तींची नावे देणे शक्य होईल, अशा ठरावाची सूचना राजू पेडणेकर यांनी शुक्रवारी पालिका सभागृहात मांडली. सभागृहाच्या मंजुरीनंतर महापौर प्रभू यांनी ही सूचना आयुक्त कुंटे यांच्याकडे पाठविली.

Story img Loader