मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. त्यामुळे महानगरपालिकेने मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत विविध भागांत विशष स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेतून अवघ्या काही तासांत ११.४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, या कचऱ्याची बुधवारी विल्हेवाट लावण्यात आली. दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील विविध चौपाट्या, उद्याने व अन्य सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. मंगळवारीही अनेक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. अस्वच्छतेमुळे त्यांची गैरसोय होऊ नये, या हेतूने विविध परिसरांत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ३१ डिसेंबर २०२४ आणि १ जानेवारी २०२५ रोजी भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया), मरीन ड्राइव्ह, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), माझगावमधील महाराणा प्रताप चौकआणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जंक्शन, कलानगर जंक्शन, वांद्रे स्थानक परिसर, जुहू चौपाटी, गोराई चौपाटी, बोरिवली बाजारपेठ, अक्सा चौपाटी ,मार्वे चौपाटी तसेच मानखुर्द आदी प्रमुख ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. महानगरपालिका कामगार, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कामगार असे सुमारे ५ हजार कामगार या मोहिमेत सहभागी झाले होते. लिटर, पिकर, जेसीबी,डंपर, बीच क्लीनिंग संयंत्र, बॉबकॅट्स, ई-स्वीपर, मिस्टिंग मशीन, कॉम्पॅक्टर आदी ७० यंत्रसामग्रीचा वापर करून ११.४ मेट्रिक टन कचरा यावेळी संकलित करण्यात आला.

हेही वाचा…कुंभमेळ्याला गेलेल्या प्रवाशांना कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवरून मिळणार रेल्वेचे तिकीट

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सूचनांनुसार, मरीन ड्राइव्ह ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था व दुभाजकांच्या ठिकाणी रस्ता रोधक, ४ निरीक्षण मनोरे (वॉच टॉवर) उभारण्यात आले होते. तसेच, या परिसरात रात्रीपाळीमध्ये मिस्ट व्हेईकल आणि लिटर पिकर या वाहनांसोबतच जेसीबी, डंपर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती.