लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : कुर्ला येथील बस दुर्घटनेतून धडा घेऊन मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने आपल्या अखत्यारीतीला वाहनांच्या चालकांनाही वाहतूकीबाबतचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. अधिकाऱ्यांची वाहने चालवणाऱ्या चालकांबरोबरच कचरा गाड्यांवरील चालकांनाही याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कुर्ला येथील दुर्घटनेनंतर चालकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. कुर्ला दुर्घटनेतील चालकाला विद्युत बस चालवण्याचे पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले नव्हते, असे आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाने आता आपल्या चालकांनाही प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. कचरा गाड्यांवरील चालकांबरोबरच अधिकाऱ्यांच्या गाडयांच्या चालकांनाही हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरीता नॅशनल सेफ्टी काऊन्सिल ऑफ इंडियाची मदत घेतली जाणार आहे. तसेच या चालकांना संगणकीय पद्धतीने आभासी वाहन चालवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर वाहतूकीच्या नियमांचीही नव्याने ओळख करून दिली जाणार आहे.

आणखी वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा रस्ते धुण्याचा प्रयोग, शंभर टँकर तैनात

मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत परिवहन विभाग येतो. या विभागाकडे मुंबई महापालिकेच्या विविध वाहनांची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. या विभागात सुमारे ७०० विविध गाड्या आहेत. यात कचरा वाहून नेणारे डंपर, कॉम्पॅक्टर यांचा समावेश आहे. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विविध ४०० गाड्या आहेत. या सर्व वाहनचालकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कंत्राटदारांच्या गाड्यांवरील चालकांनाही हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वाहतूक क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीच्या सहकार्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अनेकदा कचरा गाड्यांवरील वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवतात, कधी मार्गिका बदलतात. त्यामुळे भविष्यात अपघात घडू नये म्हणून चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहनचालकांना वाहतूकीच्या नियमांबाबत, पादचाऱ्यांच्या हक्काबाबत जागृत करणे, त्यांना स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे देणे हा देखील या प्रशिक्षणाचा भाग असल्याची माहिती घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.