शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारसमयी सुरक्षिततेच्या बाबींसाठी आलेल्या खर्चापोटी शिवसेनेने दिलेला पाच लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुखांकडे परत पाठविण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यामुळे तो खर्च राज्य सरकारच उचलणार. त्यामुळे या पाच लाख रुपयांबाबत राज्य सरकार आणि पालिका निर्णय घेईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने या खर्चास कार्योत्तर मंजुरी घेण्यासाठी अलीकडेच एक प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता. यावरून बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे खर्चापोटीचे हे पाच लाख रुपये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिकेकडे सुपूर्द केले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-06-2013 at 05:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal will return five lakhs rupees cheque to shivsena kunte