शिकलगर टोळीचा महोरक्या व कुख्यात दरोडेखोर नाडासिंग टाक याच्या हत्येप्रकरणात वर्षभरापासून फरार असलेल्या दोन जणांना वर्तकनगर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली असून हे दोघे नाडासिंगचे मेहुणे आहेत.
जगनसिंग कलानी (२६) आणि शेषपाल उर्फ पापा कलानी (२१), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हे दोघेही ठाण्यातील शिवाईनगर भागात राहतात. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कुख्यात दरोडेखोर नाडासिंगची सुऱ्याने वार करून तसेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह लोकमान्यनगर येथील फायरिंग रेंज परिसरात फेकून देण्यात आला होता. त्याची पत्नी, सासरे, मेहुणे आणि इतर साथीदार, अशा अकरा जणांनी मिळून नाडासिंगची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अकराजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
खूनातील आरोपींना गुजरातमधून अटक
शिकलगर टोळीचा महोरक्या व कुख्यात दरोडेखोर नाडासिंग टाक याच्या हत्येप्रकरणात वर्षभरापासून फरार असलेल्या दोन जणांना वर्तकनगर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली असून हे दोघे नाडासिंगचे मेहुणे आहेत.
First published on: 28-01-2013 at 03:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder case accused arrested from gujrat